महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आघाडीचं ठरलं.! विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होणार - काँग्रेस-राष्ट्रवादी युती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील कलम 370 हटविण्याचे समर्थन करत असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

congress-and-ncp-will-form-alliance-in-upcoming-elections-says-praful-patel

By

Published : Aug 17, 2019, 7:42 PM IST

Updated : Aug 17, 2019, 8:02 PM IST

गोंदिया - येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज केले. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेबद्दल बोलताना, महाजनादेश मागणे हा भाजपचा हक्क आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोक भाजपला त्यांची जागा दाखवतील, अशी टीका पटेल यांनी केली.

आघाडीचं ठरलं.! विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होणार

केंद्र सरकारकडून काश्मीरमधून कलम 370 हटविण्यासंदर्भात पटेल म्हणाले, हा निर्णय घेताना सरकारने या संदर्भात तेथील स्थानिक पक्ष आणि देशातील इतर पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा केली असती, तर याला सहज स्वीकारण्यात आले असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील कलम 370 हटविण्याचे समर्थन करत असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Last Updated : Aug 17, 2019, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details