गोंदिया - जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची मुलगी दिव्या गुंडे हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दिव्याने 338 वी रँक प्राप्त केली आहे. दिव्याने या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले आहे. 24 सप्टेंबर रोजी यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा हेही वाचा -कौतुकास्पद... लहानपणी विकायचा चहा-भजी, आता पोलिस करतील कडक सॅल्युट, बारामतीचा अल्ताफ झाला IPS अधिकारी
- जिल्हाधिकाऱ्यांची मुलगी यूपीएससीत उत्तीर्ण -
दिव्या गुंडे ही गोंदियाच्या महिला जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची मुलगी आहे. दिव्याने ऑक्टोबर 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली होती. २१ सप्टेंबर २०२१ रोजी तिची दिल्ली येथे मुलाखत झाली. यात उत्तीर्ण होत दिव्याला देशात 338 वी रँक मिळाली आहे.
दरम्यान, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे श्रेय दिव्याने आई जिल्हाधिकारी नयना गुंडे व वडील अर्जुन गुंडे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक) यांना दिले आहे. तसेच हे यश शिक्षक व मार्गदर्शक यांच्या मोलाच्या मार्गदर्शनातून मिळाले आहे, असे दिव्या गुंडे हिने सांगितले आहे.
हेही वाचा -कौतुकास्पद.. अल्पदृष्टी असल्याने ऑडियो ऐकून केला अभ्यास, आनंदा पाटीलचे UPSC परीक्षेत घवघवीत यश