महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 4, 2019, 9:29 AM IST

ETV Bharat / state

नाना पटोलेंनी गोंदियात पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी - मख्यमंत्री

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मुख्यमंत्री यांचे स्वागत करण्यात आले. येथील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत  हिंमत असेल तर गोंदियात पत्रकार परिषद घ्या, असा टोला लगावला.

गोंदियात सेव्ह मॅरीड सेव्ह नेशन संघटनेकडून  मुख्यमंत्र्याचा ताफा आडवण्याचा प्रयत्न

गोंदिया- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्ट पासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे, ही यात्रा शनिवारी गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मुख्यमंत्री यांचे स्वागत करण्यात आले. येथील सभेला संबोधीत करताना मुख्यमंत्री यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत हिंमत असेल तर गोंदियात पत्रकार परिषद घ्या, असा टोला लगावला.

गोंदियात सेव्ह मॅरीड सेव्ह नेशन संघटनेकडून मुख्यमंत्र्याचा ताफा आडवण्याचा प्रयत्न

येथील सभेत मुख्यमंत्री बोलताना म्हणाले, काही दिवसासाठी आपल्या पक्षात आलेले खासदार नंतर ते परत गेले. त्यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली.मात्र त्यांची हिंमत येथे गोंदियात पत्रकार परिषद घेण्याची नाही. हिंमत असेल तर गोंदिया येथे पत्रकार परिषद घ्या असा टोला नाना पटोले यांना लगावला.

जुन्या सरकारात निवडणूक आली की, धानाला बोनस द्यायचे व निवडणूक झाली की, बोनस गायब व्हायचे मात्र, आमच्या सरकारने पाच ही वर्ष बोनस दिला आहे. असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details