मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; इनोव्हा बोलेरोला धडकली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अर्जुनी-मोरगाव जवळील नवेगावबांधजवळ ताफ्यातील बोलेरो गाडीला इनोव्हा गाडीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ताफ्याचे नियोजन नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; इनोव्हा बोलेरोला धडकली
गोंदिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या महाजनादेश यात्रा सुरू आहे. आज यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्याच्या गाड्यांचा ताफा गोंदियावरून अर्जुनी-मोरगाव या ठिकाणी जात असताना अर्जुनी-मोरगाव जवळील नवेगावबांधजवळ ताफ्यातील बोलेरो गाडीला इन्होव्हा गाडीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ताफ्याचे नियोजन नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
Last Updated : Aug 4, 2019, 2:59 PM IST