महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री व गडकरी यांच्या हस्ते सिंचन प्रकल्पाचे इ भूमिपूजन - गडकरी

वैनगंगा नदीवरील पाणी शेतकऱ्यांना देण्याकरिता धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आहे.

भूमिपूजन

By

Published : Feb 23, 2019, 8:43 PM IST

गोंदिया - तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामाचे इ भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. वैनगंगा नदीवरील पाणी शेतकऱ्यांना देण्याकरिता धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आहे. हे पाणी चोरखमारा तलावात सोडण्यात येणार असून यामुळे २७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

भूमिपूजन

भूमिपूजन

चांगले अधिकरी व लोकप्रतिनिधी आल्यास विकास शक्य आहे. आम्ही कामे केल्याने विदर्भ, महाराष्ट्रचा तसेच देशाचा चेहरा बदलला आहे, याचे श्रेय आम्हाला नाही जनतेला आहे असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

पूर्वीच्या सरकारच्या काळात ५० वर्षात जितका निधी मिळाला नाही तितका निधी या साडेचार वर्षात मिळाला आहे. याधी विदर्भावर नेहमीच अन्याय होत होता. काँग्रेसने १० वर्षात एकदा कर्जमाफी दिली. मात्र, भाजप सरकार प्रत्येक वर्षी कर्जमुक्ती देत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details