गोंदिया -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर जे नागरिक मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. अशा लोकांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे बीपीएल रेशन कार्डधारकांना शासनातर्फे स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुबियांना ३५ किलो धान्य देण्यात येत आहे. मात्र, अनेक दुकानदार ग्राहकांची पिळवणूक करत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गोंदिया मतदारसंघाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी पाहणी करून दुकानदारांना परवाना रद्द करण्याचा इशार दिला.
स्वस्त धान्य दुकानदारांनी ग्राहक पिळवणूक थांबावी; अन्यथा... - gondia corona update
ग्राहकांची दुकानदारांच्या गैरप्रकारबद्दल तक्रार आल्यास दुकानांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे गोंदिया मतदारसंघाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.
बीपीएल रेशन कार्ड धारकांना ३ रुपये किलो तांदुळ आणि २ रुपये किलो प्रमाणे गहू दिले जात आहेत. १० किलो गहू आणि २५ किलो तांदुळ तसेच १ किलो साखर देण्यात येत आहे. केंद्र सरकारतर्फे आता प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. मात्र, अनेक स्वस्त धान्य दुकानावर ग्राहकांची पिळवून करत आहेत. त्यामुले अग्रवाल यांनी शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक स्वस्त धान्य दुकानांवर भेट देत लाभार्त्यांशी आणि स्वस्त धान्य दुकानदारांशी संपर्क साधला.
वेळेवर आणि ठरवीलेल्या किंमतीत धान्य देत आहेत की नाही याची खात्री अग्रवाल यांनी केली. तसेच दुकानदारांना सूचना दिल्या की, ग्राहकांची दुकानदारांच्या गैरप्रकारबद्दल तक्रार आल्यास दुकानांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.