गोंदिया -दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या 17 वर्षाच्या तरुणाची बोर्डाच्या परीक्षेवरून परतताना हत्या झाली. यानंतर मारेकऱ्याने मृताला घराजवळील शेतात नेऊन त्याची जीभ कापली. अज्ञात आरोपीने पूर्ववैमनस्यातून चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. आता या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. आपल्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून आरोपी मनीराम गुरुबेले (वय 45) याने कुऱ्हाडीने वार करत अतुलचा खून केला आहे. गोंदिया पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
प्रेमप्रकरणाच्या संशयातून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या; आरोपी गजाआड - boy stabbed in gondiya
मोरवाही गावातील एका विद्यार्थ्याने दहावीचा पेपर दिला. यानंतर घरी परतताना एका अज्ञात व्यक्तीने दबा धरून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. तसेच जवळ असलेल्या शेतात नेऊन त्याची जीभ कापून हत्या केली आहे.
मोरवाही गावातील १७ वर्षाचा अतुल तरोने हा विद्यार्थी दहावीचा पहिला पेपर संपल्यानंतर घरी परतत होता. त्याच्या घरापासून 400 ते 500 मीटर अंतरावर शेतात दबा धरून बसलेल्या आरोपीने अतुलला अडवून शेतात नेले. यानंतर आरोपीने त्याचा गळा, पाठ व तोंडावर चाकुने वार केले. तसेच आरोपीने अतुलची जीभ कापली. संबंधित घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हेही वाचा -VIDEO: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात महिला चोर सक्रिय; सीसीटीव्हीत चोरी कैद