गोंदिया - आगामी विधानसभा निवडणूकींच्या आधी अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात बेडूक उड्या मारतआहेत. यामध्ये आणखी भर पडली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार तसेच तिरोड्याचे माजी आमदार डॉ. खुशालचंद्र बोपचे यांनी आज राष्टवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला झटका दिला आहे.
भाजपला झटका माजी खासदार बोपचेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, तिरोड्यातून निवडणुकीच्या रिंगणात
डॉ. खुशालचंद्र बोपचे यांचे चिरंजीव व भाजपचे जिल्हा महामंत्री रविकांत(गुड्डू) बोपचे यांनी तिरोडा विधानसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षत्याग करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे डॉ. बोपचे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. डॉ. बोपचे यांचे चिरंजीव व भाजपचे जिल्हा महामंत्री रविकांत(गुड्डू) बोपचे यांनी तिरोडा विधानसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षत्याग करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता तिरोडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस रिपाईचे अधिकृत उमेदवार म्हणून रविकांत बोपचे हे आज(शुक्रवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अग्रवाल यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश