महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 2, 2020, 11:24 AM IST

Updated : Feb 2, 2020, 11:35 AM IST

ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन, नागरिकांचे हाल

विविध मागण्यांसाठी गोंदियातील बँक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.

आंदोलनात सहभागी बँक कर्मचारी
आंदोलनात सहभागी बँक कर्मचारी

गोंदिया- सन्मानजनक पगारवाढ द्या, यासह अन्य मागण्यांना घेऊन युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने शुक्रवार व शनिवारी दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. बँक कर्मचाऱ्यांनी येथील स्टेट बँक व बँक ऑफ इंडिया समोर घोषणाबाजी करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पगारवाढ द्या, 5 दिवसांचा आठवडा, स्पेशल अलाऊंस मूळ पगारात समाविष्ट करावा, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन पुन्हा सुरू करावी, महागाई भत्ता मूळ पेन्शनमध्ये समाविष्ट करून पेंशनची पुर्नरचना करावी. फॅमिली पेन्शनमध्ये पुरेशी वाढ करावी, कार्यरत नफ्याशी निगडीत कर्मचारी कल्याण योजना, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभावर प्राप्तिकर लागू करू नये. कामकाजाची वेळ व मध्यांतर यात सुसूत्रता आणावी, लिव्ह बँक योजना लागू करावी, अधिकारी वर्गाचे कामाचे तास निर्धारीत करावे. कंत्राटी कर्मचारी तसेच बिझनेस करस्पॉडंट यांना नियमित कर्मचारी एवढाच पगार द्यावा, आदी मागण्यासाठी युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने हे कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

हेही वाचा - 'गोंदियातील गुजराती राष्ट्रीय माध्यमिक शाळा शैक्षणिक क्रांतीतील मैलाचा दगड'

या आंदोलनामुळे मात्र सर्व सामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे दिसते. युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय संपाची हाक देण्यात आली होती. या संपात गोंदिया जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकाचे 500 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील 50 कोटी रुपयांहून व्यवहार ठप्प झाले होते. बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका अनेक ग्राहकांना सुध्दा बसला आहे.

युनियनच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत सध्या 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी कामबंद आंदोलन केले आहे. तसेच 11, 12 व 13 मार्च रोजी कामबंद आंदोलन केले जाईल. यानंतरही मागण्या मान्य पूर्ण न झाल्यास 1 एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार आहे.

हेही वाचा - मोटारसायकल चोरीच्या आंतरराज्यीय टोळीतील ३ चोरांना अटक

Last Updated : Feb 2, 2020, 11:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details