गोंदिया -देशात लॉकडाऊन सुरू असल्याने अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाकी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. याचाच फायदा घेत गोंदिया शहरातील मुरी परिसरात साई बिल्डींग मटेरियल सप्लायरच्या दुकानाला अज्ञात व्यक्तीने आग लावली. मध्यरात्रीच्या वेळेस दुकानाचे शटर तोडून पेट्रोल टाकून ही आग लावण्यात आली. या आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
लॉकडाऊनचा फायदा घेत अज्ञाताने पेटवले दुकान.. - गोंदिया पोलीस
लॉकडाऊन सुरू असल्याने अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाकी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. याचाच फायदा घेत गोंदिया शहरातील मुरी परिसरात साई बिल्डींग मटेरियल सप्लायरच्या दुकानाला अज्ञात व्यक्तीने आग लावली
दुकानाला आग
मध्यरात्री दुकानाला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुकान मालकाला याची कल्पना दिली. अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले मात्र, तोपर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणी दुकान मालकाने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. आरोपीचा शोध घेऊन त्याला शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली.