महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात रुग्णवाहिकेने दिली ऑटोरिक्षाला धडक; पाच प्रवाशी जखमी - गोंदिया अपघात बातमी

अशोक भय्यालाल भोंगाडे असे रिक्षाचालकाचे नाव आहे. अशोक प्रवासी घेऊन खमारीवरुन आमगावच्या दिशेने जात होता. दरम्यान, ठाणा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने ऑटोरिक्षाला जबर धडक दिली.

रुग्णवाहिकेने दिली ऑटोरिक्षाला धडक

By

Published : Nov 9, 2019, 8:18 PM IST

गोंदिया - येथील ठाणागाव ते दहेगाव जवळ आज (शनिवारी) सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिका व ऑटोरिक्षा यांचा अपघात झाला. अपघातात खमारी येथील ५ जण जखमी झाले आहे. गोंदियावरुन आमगावला प्रवासी घेऊन जाणाऱ्या प्रवासी ऑटो रिक्षाला समोरुन येणाऱ्या रुग्णवाहिकेने धडक दिली आहे.

रुग्णवाहिकेने दिली ऑटोरिक्षाला धडक

हेही वाचा-Ayodhya Judgment: 'निकाल जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका, राम-रहीम भक्तीपेक्षा भारतभक्तीची ही वेळ - पंतप्रधान

जखमींना उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले आहे. अशोक भय्यालाल भोंगाडे (वय ५० वर्षे) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याने आमगाव येथे पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. अशोक प्रवासी घेऊन खमारीवरुन आमगावच्या दिशेने जात होता. दरम्यान, ठाणा गावाजवळ भरधाव वेगाने येणारी मारोती सुझुकी इक्वो (३५ के -५२१४) या रुग्णवाहिकेने ऑटोरिक्षाला जबर धडक दिली. रुग्णवाहिकेचा चालक मोबाईलवर बोलत होता, असे अशोक यांचे म्हणणे आहे. अपघातानंतर रुग्णवाहिका चालकाने पळ काढला. या अपघातात ऑटोरिक्षातील प्रवाशी जखमी झाले आहेत. देवराम चुटे, राधिका मेंढे, बंसत बांगड, देवाजी बागडे व गंगा भांडारकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details