महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात लॉकडाऊनमुळे अपघात घटले; मागील वर्षीच्या तुलनेत ५५ अपघात कमी - Gondia accident news

कोरोना महामारीने जगाला हादरवून सोडले आहे. मात्र, याचा परिणाम अपघातावर झाला असून काही प्रमाणात अपघातात घट झाल्याचे दिसून आले आहे. २०१९ च्या तुलनेत या वर्षी ५५ अपघात कमी झाले आहेत.

Gondia accident news
गोंदिया अपघात

By

Published : Dec 29, 2020, 5:34 PM IST

गोंदिया - कोरोना महामारीने जगाला हादरवून सोडले आहे. मात्र, याचा परिणाम अपघातावर झाला असून काही प्रमाणात अपघातात घट झाल्याचे दिसून आले आहे. २०१९ च्या तुलनेत या वर्षी ५५ अपघात कमी झाले आहेत.

माहिती देताना गोंदिया वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे

हेही वाचा -गुन्ह्याच्या उद्देशाने अवैध पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक; गोंदियातील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मागील ११ महिन्यात २४५ अपघात झाले असून १५३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वर्षी १९० अपघातात ११६ जणांना आपला जीव गमावा लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असल्याने मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ५५ अपघात कमी झाले आहेत. कोरोनामुळे सर्वच धास्तावले असताना अपघातावर मात्र नियंत्रण आले आहे.

२०२० या वर्षात अपघाताच्या संख्येत घट

२०१९ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान २४५ अपघात झाले होते. त्यात १५३ लोकांचा मृत्यू झाला होता. १७० नागरिक गंभीर जखमी झाले होते, तर १४२ नागरिक किरकोळ जखमी झाले होते. परंतु, २०२० या वर्षात अपघाताच्या संख्येत घट झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन, संचारबंदी असल्यामुळे अपघातात घट झाली आहे. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात १९० अपघात घडले असून, ११६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ९८ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, १२७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अपघात अधिक झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा. त्याचप्रमाणे वाहन चालवताना मद्यसेवन करू नये, असे संदेश वाहतूक विभागाकडून अनेकदा दिले जातात. मात्र, वाहनचालक याकडे कानाडोळा करतात.

हेही वाचा -पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details