गोंदिया- जिल्ह्यातील देवरी येथे आमगाव रोडवरील डवकी फाट्याजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर ४ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर गोंदिया जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू - आमगांव
देवरी येथे आमगाव रोडवरील डवकी फाट्याजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर ४ गंभीर जखमी झाले आहेत.
विजय भोजराज चौधरी (वय 26 वर्ष रा. सालेगाव ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रमिला तेजराम वट्टी (वय 55 वर्ष), प्रियंका तेजराम वट्टी (वय 16 वर्ष), मंगेश नामदेव कापसे (वय 25 वर्ष) आणि योगेश नामदेव कापसे (वय 20 वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
देवरी ते आमगाव या मार्गावर रस्त्याचे काम सुरु असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे समोरून कोणते वाहन येत आहे, हे दिसत नाही. यामुळे अनेकदा या मार्गावर अपघात होत असतात. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास २ मोटारसायकली समोरासमोर धडकल्या. या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर अन्य ४ जण जखमी झाले.