गोंदीया- राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोंदिया पोलीस आणि सामाजिक न्याय विभागातर्फे गोंदिया शहरात व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात होते. पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी व्यसनमुक्ती रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.
गोंदियात अमली पदार्थदिनानिमित्त पोलीस विभागाकडून काढण्यात आली रॅली - Omprakaesh Sapate
आज राजश्री शाहू महाराजांची जयंती आणि जागतीक व्यसनमुक्ती दिन. यानिमित्ताने गोंदीयात आज पोलीस प्रशासनाकडून व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली आणि सामाजिक न्याय विभागातर्फे समता रॅली काढण्यात आली.
पोलिसांकडून काढण्यात आलेल्या रॅलीचे छायाचित्र
यावेळी त्यांनी गोंदियाकरांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचा सल्ला दिला. तर सामाजिक न्याय विभागातर्फे समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम पासून रॅलीची सुरुवात झाली असून नेहरू चौक, गोरे लाल चौक, सिटी पोलीस स्टेशन, गांधी प्रतिमा, जस्तंभ चौक अशा अनेक चौकातून रॅली काढण्यात आली. यावेळी व्यसनमुक्तीचे संदेश देत आंबेडकर चौकात या रॅलीचे समारोप करण्यात आले.