गोंदिया - स्थानिक गुन्हे शाखेने गोरेगाव पोलीस आणि तहसीलदार यांच्यासह गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव येथे नेवालाल यशवंत पटले यांच्या घरावर धाड टाकली. यावेळी त्यांच्या घरात 183 कट्टे अवैध तांदळाचा साठा आढळून आला. यानंतर लगेचच तहसीलदारांनी पंचनामा करून ९० क्विंटल तांदूळ जप्त केला आहे. जप्त केलेला तांदूळ शासकिय गोदाम गोरेगाव येथे ठेवण्यात आला आहे.
गोंदियात 90 क्विंटल अवैध तांदळाचा साठा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई - illegal rice
यशवंत पटले यांच्या घरात राशनच्या तांदळाचा अवैध साठा असल्याची गुप्त माहिती गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
यशवंत पटले यांच्या घरात राशनच्या तांदळाचा अवैध साठा असल्याची गुप्त माहिती गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली
यासंदर्भात नेवालाल पटले यांची चैकशी केली असता, मोहाडी गावच्या विलास बघेले यांनी हा तांदूळ आणून ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. तांदळाच्या पोत्यावर असलेल्या मार्क नुसार ही पोती शासकीय असल्याचे समजते. बघेले हा गोरेगाव तालुक्यातील मोहाडी गावचा रहिवासी आहे. या कट्ट्यांवर श्री अशोका राईस ट्रेडर्स सर हिंद एफजीएस (पी बी) लिहिले असल्याने, या प्रकरणातील सर्व आरोपीची चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.