गोंदिया -७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गोंदिया येथील कारंजा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कवायत करण्यात आली. मुख्य ध्वजारोहण राज्याचे गृहमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात संयुक्त संचलन केले गेले, यानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले व पोलिसांची मानवंदना स्वीकारली.
मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस भरती थांबलेली होती. मात्र, आता राज्यात लवकरच ८ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून त्यामुळे राज्यातील तरुणांना पोलीस सेवेत काम करण्याची संधी मिळेल, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचा -देवरीतील मॅरेथॉनमध्ये धावले हजारो धावपटू; १६ जिल्ह्यातील धावपटूंनी घेतला सहभाग