गोंदिया - जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश जिल्ह्यातील बालाघाट पोलिसांनी नक्षलवाद्यांना साहित्य पुरवणाऱ्या आठ आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी नक्षलवाद्यांना नक्षली साहित्य, विस्फोटक आणि हत्यार पुरवठा करत होते. आरोपींना नक्षल सप्ताहादरम्यान अटक करण्यात आली आहे.
माहिती देताना बालाघाट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हेही वाचा -विद्यार्थ्यांसाठी स्मशानातील झाड झाले मोबाईल टॉवर...पाहा हा व्हिडिओ
पोलिसांनी आरोपींकडून एके 47 सह जिलेटीन रॉड, पिस्तुल, रायफल, कोडेक्स, दोन स्कोडा वाहन, एलईडी इत्यादी साहित्य जप्त केले आहेत. अटक झालेल्यांमध्ये गोंदिया, ठाणे, कोटा जिल्ह्यातील आरोपींचा समावेश. आरोपी हे महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना विस्फोटक साहित्य पुरवठा करण्साठी जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली. नक्षल सप्ताहादरम्यान मोठा घातपात करण्यासाठी नक्षल्यांना हा शस्रसाठा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती बालाघाट पोलिसांनी दिली.
हेही वाचा -मुलाबाळांनी नाकारले.. सावलीने स्वीकारले; गोंदियातील निराधारांना आपुलकीचा आधार