गोंदिया- जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात वीज पडून एका शेतकऱ्याच्या ६ म्हशींचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे 'त्या' शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.
गोंदिया जिल्ह्यात वीज पडून ६ म्हशींचा मृत्यू; शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे नुकसान - died
जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात वीज पडून एका शेतकरीच्या ६ म्हशींचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे 'त्या' शेतकरीचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.
जून महिना संपत आला मात्र गोंदिया जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली नव्हती. शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसात काही ठिकाणी वीज पडल्याच्याही घटना घडल्या. यामध्ये तिरोड तालुक्यातील देबीलाल बिसेन यांच्या तब्बल ६ म्हशी वीज कोसळल्याने मृत्यूमुखी पडल्या आहेत. बिसेन यांनी नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी शेतात बांधल्या होत्या. तेव्हा अचानक वीज कोसळून म्हशींचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेने देबीलाल बिसेन यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बिसेन यांचे कुटुंब दुग्धव्यवसायावर अवलंबून होते. त्यांना नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शासनाने बिसेन यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.