महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत ५ पंपिंग स्टेशन कार्यरत; तर ३ चे काम सुरू, मुख्यमंत्र्यांचा दावा - mumbai

मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे होणाऱया नुकसानावर उपाय म्हणून शासनामार्फत ८ पंपिंग स्टेशन मंजूर करण्यात आले होते. त्यातील ५ पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत तर ३ पंपिंग स्टेशनचे काम सुरु असल्याचा दावा मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 4, 2019, 12:14 PM IST

गोंदिया - मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे होणाऱया नुकसानावर उपाय म्हणून शासनामार्फत ८ पंपिंग स्टेशन मंजूर करण्यात आले होते. त्यातील ५ पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत, तर ३ पंपिंग स्टेशनचे काम सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला. मुख्यंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा आज चौथा दिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते येथे बोलत होते.

मुंबईत मुसळधार पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. मात्र, त्याच वेळी समुद्राला आलेल्या भरतीमुळे ते समुद्रात जमा न होता रस्त्यांवर जमा होवून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून मुंबईत ८ पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी ५ पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत तर ३ पंपिंग स्टेशनचे काम सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला. या तीनही पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर शहरात ही परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

त्याच बरोबर ही पाण्याच्या समस्येवर नागरिकांची मदत करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग सदैव कार्यरत आहे, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details