गोंदिया - जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गप्पू गुप्ता यांनी काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केले आहे. असे असताना रविवारी पुन्हा तब्बल 48 आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-सदस्यांनी काँगेस पक्षात यांनी प्रवेश केला. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती सुरू झाली झाल्यीच चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल जिल्हा दौरा करत आहेत.