गोंदिया- दुर्गा देवी विसर्जना करिता गेलेल्या २७ वर्षीय युवकाच्या शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मक्कीटोला गावात घडली. दुर्गेश वट्टी असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मक्कीटोला गावामध्ये काल (सोमवार ता. २६) नवयुवक दुर्गा उत्सव समितीच्या वतीने दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी निघालेल्या या मिरवणूकीत दुर्गेश वट्टी हा देखील सहभागी झाला होता. मूर्तीचे शेततळ्यात विजर्सन करण्यात येत असताना दुर्गेश याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला.