महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदींच्या सभेवरून परतताना पोलिसांच्या बसला अपघात; ११ जखमी - पंतप्रधान नरेंद्र मोदी

अपघात किरकोळ जखमी झालेल्या पोलिसांवर गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ४ ते ५ पोलीस गंभीर जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामध्ये जखमी झालेले पोलीस

By

Published : Apr 4, 2019, 7:58 AM IST

Updated : Apr 4, 2019, 11:49 AM IST

गोंदिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आटोपून परतणाऱ्या पोलिसांच्या बसला अपघात झाला. यामध्ये ११ पोलीस जखमी झाले आहेत. त्यापैकी ४ ते ५ जण गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस उलटल्याने हा अपघात झाला आहे.

अपघातामध्ये जखमी झालेले पोलीस

शहरात बुधवारी पंतप्रधान मोदींची सभा होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री सभा संपल्यानंतर पोलीस ठाण्याकडे परतत असताना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गोंदिया ते आमगाव रस्त्यावर अचानक बस उलटली. या बसमधून जवळपास २६ ते २७ पोलीस कर्मचारी प्रवास करत होते. सर्वजण पुण्यातील ग्रुप-डी चे कर्मचारी आहेत.

अपघात किरकोळ जखमी झालेल्या पोलिसांवर गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ४ ते ५ पोलीस गंभीर जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Last Updated : Apr 4, 2019, 11:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details