गडचिरोली - शासनाकडून २ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षल महिलेने शुक्रवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. करिश्मा उर्फ गंगा उर्फ सविता अजय नरोटी (वय २०) असे आत्मसमर्पण करणाऱ्या महिला नक्षलीचे नाव आहे. ती नक्षल्यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव दलमची सदस्य असून, छत्तीसगड राज्यातील पाखांजूर तालुक्यातील बेटिया गावची रहिवासी आहे.
दोन लाखांचे बक्षीस असलेल्या महिला नक्षलीचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण - महिला नक्षलीबद्दल बातमी
दोन लाखांचे बक्षीस असलेल्या महिला नक्षलीचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. 2019 ते 2021 पर्यंत 38 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.
'38 नक्षल्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण' -
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक मानस रंजन व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत करिश्माने आत्मसमर्पण केले. तिच्यावर चकमकीचे 4 गुन्हे दाखल असून, शासनाने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नक्षल्यांनी विकासकामांत आडकाठी न आणता आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी केले. 2019 ते 2021 पर्यंत 38 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यात 4 विभागीय समिती सदस्य, 2 दलम कमांडर, 3 उपकमांडकर, 28 सदस्य व 1 जनमिलिशिया सदस्याचा समावेश आहे.