गडचिरोली - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्तात सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. तसेच पावसाची शक्यता देखील आहे. त्यामुळे सकाळपासूनच मतदारांच्या रांगा बघायला मिळत आहेत.
गडचिरोलीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात - गडचिरोलीमध्ये मतदान
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, आरमोरी, गडचिरोली या तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. त्यामुळे सकाळी ७ वाजतापासून शहरी तसेच ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, आरमोरी, गडचिरोली या तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. त्यामुळे सकाळी ७ वाजतापासून शहरी तसेच ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली जिल्ह्यात पाऊस झाला. आजही ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेकजण सकाळीच मतदान करण्याला पसंती दिली असून मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मतदान शांततेत पार पाडावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.