गडचिरोली - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी धानोरा तालुक्यातील चातगाव येथे मतदान केले. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या सन्मानासाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन केले.
गडचिरोलीत मतदानाला सुरुवात; समाजसेवक बंग दांम्पत्याने केले मतदान
गडचिरोलीत सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. नक्षलवाद्यांच्या सावटामुळे गडचिरोली, अहेरी, आरमोरी या तीनही विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
गडचिरोलीत सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. पावसाची शक्यता असल्याने मतदार सकाळपासूनच मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत. नक्षलवाद्यांच्या सावटामुळे गडचिरोली, अहेरी, आरमोरी या तीनही विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पाऊस व उन्हापासून बचाव करण्यासाठी मतदान केंद्र परिसरात मंडप उभारण्यात आले आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.