महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट; गावकऱ्यांनी केली नक्षलवाद्यांच्या बॅनरची होळी - गडचिरोली विधानसभा मतदारसंघ

विधानसभा निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट असून, मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रक व बॅनरच्या माध्यमातून केले आहे. मात्र, नक्षलवाद्यांना न जुमानता गावकऱ्यांनी बॅनर व पत्रकाची होळी करून 'नक्षलवादी मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या.

निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट; गावकऱ्यांनी केली नक्षलवाद्यांच्या बॅनरची होळी

By

Published : Oct 18, 2019, 8:02 PM IST

गडचिरोली - विधानसभा निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट असून, मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रक व बॅनरच्या माध्यमातून केले आहे. मात्र, नक्षलवाद्यांना न जुमानता गावकऱ्यांनी बॅनर व पत्रकाची होळी करून 'नक्षलवादी मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या.

निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट; गावकऱ्यांनी केली नक्षलवाद्यांच्या बॅनरची होळी

उपविभाग भामरागड अंतर्गत येणा-या लाहेरी हद्दीतील लाहेरी, मलमपडुर, भुसेवाडा, कुकामेटा, लष्कर, आलदंडी व गोपणार या भागात नक्षलवाद्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बॅनर व पोस्टर्सव्दारे ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते.

परंतु, नक्षलवाद्यांनी केलेल्या या आवाहनाला गावक-यांनी सडेतोड उत्तर दिले असून, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे एकत्र येऊन लोकशाहीवर विश्वास दाखवत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर्स व पोस्टर्सची होळी केली आहे. नक्षलवादी स्वत:च्या फायदयासाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत असून, आम्ही आमच्या भागाच्या विकासासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे गावकऱयांनी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील 200 ते 300 नागरिक उपस्थित होते.

नक्षलवाद्यांचा विरोध करत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मोठया प्रमाणावर घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details