गडचिरोली- मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरासह धानोरा, कुरखेडा, आरमोरी आणि देसाईगंज या तालुक्यांमध्ये गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळ, नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसाची कोणतीही शक्यता नसताना अचानक झालेल्या पावसाने सारेच अचंबित झाले होते.
गडचिरोलीत गारपिटीसह अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना फटका - gadchiroli
सकाळी थोडा उघड होता. पावसाची कोणतीही शक्यता नव्हती. मात्र, दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास ढग दाटून आले आणि अचानक १५ ते २० मिनिटे धो-धो पावसासह गारपीट झाली. त्यामुळे, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
सकाळी थोडा उघड होता. पावसाची कोणतीही शक्यता नव्हती. मात्र, दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास ढग दाटून आले आणि अचानक १५ ते २० मिनिटे धो-धो पावसासह गारपीट झाली. त्यामुळे, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या रब्बी पीक हातात आले असून अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकाचे ढिग करून ठेवले होते. मात्र, पावसामुळे अनेकांचे पीक भिजले असून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
हेही वाचा-भामरागड-आलापल्ली मार्गावर नक्षली बॅनर; रस्त्याच्या मधोमध स्फोटके लावल्याचा संशय