गडचिरोली - मौजा मल्लमपोडूर येथिल अंगणवाडीतील मुलांना साहित्य वाटप व पालकांना मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारचा उपक्रम भामरागड तालुक्यात प्रथमच राबवण्यात आला आहे.
भामरागड तालुक्यातील मल्लमपोडुर ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीतील बालकांना गणवेशासह सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम तालुक्यात पहिल्यांदाच राबवण्यात आला असून यात अंगणवाडीतील बालकांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले आहे.
ग्राम पंचायत गावाच्या विकासबरोबर गावतील बालकांचा विकास व्हावा यादृष्टीने मोलाचे उपक्रम घेऊन गणवेष, स्कूल बॅग, टिफिन करीता बास्केट, पाटी, लेखनी, ड्रॉयिंग बुक, स्केच पेन ई. साहित्य देण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शहरातील मुलांना कॉन्व्हेंटमध्ये बॅग, हातामध्ये बास्केट व सूट, बूटसह पाठविले जाते. मात्र, आदिवासी क्षेत्रामध्ये आर्थिक परिस्थितीमुळे अशा सुविधा मिळण्याची शक्यता सहसा नसतेच. याच हेतूने ग्राम पंचायत मल्लमपोडुर येथील शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला. ग्राम पंचायत मल्लमपोडुरचे सचिव अविनाश गोरे, सरपंच अरुणा वेलादि यांनी ग्रामसभेत ठराव पारित करून ग्रामसभा, अंगणवाडी सेविका यांच्याशी चर्चा करुन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडीतील बालकांना साहित्य देण्याची निर्णय घेतला.