गडचिरोली : प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या सात महिन्यांच्या गरोदर बहिणींवर दोन भावांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कुरखेडा तालुक्यात घडली आहे. सात महिन्याच्या गरोदर बहिणीवर भावांनी बलात्कार केल्याप्रकरणी दोन नराधम भावांना कुरखेडा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भावांचे लग्न झाले आहे. दोन भावांनीच गरोदर बहिणीवर बलात्कार केल्यामुळे गडचिरोलीत मोठी खळबळ उडाली आहे.
बहीण सात महिन्यांची गर्भवती : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बहीण ही सात महिन्यांची गरोदर आहे. प्रसूतीसाठी ती काही दिवसांपूर्वी माहेरी आलेली होती. दरम्यान 10 ऑगस्टला पीडितेचे आई वडील शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. दुपारी 12 वाजताच्या सुमारास नराधम भावांनी पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधून बलात्कार केला. पीडितेचे आई वडील घरी आल्यानंतर पीडितेने त्यांना भावांनी केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी तात्काळ कुरखेडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली. गरोदर बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन्ही भावांवर कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुरखेडा पोलिसांनी दोन्ही नराधम भावांच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पीडिता प्रसूतीसाठी आली होता माहेरी :या घटनेतील पीडिता ही सात महिन्यांची गरोदर आहे. पीडितेच्या आई वडिलांनी तिला प्रसूतीसाठी माहेरात आणले होते. मात्र बहिणींच्या असहायतेचा फायदा घेत नराधम भावांनी बहिणीवर अत्याचार केला. पीडितेने तिचे आई वडील घरी आल्यानंतर याबाबतची माहिती त्यांना दिली. त्यामुळे पीडितेच्या आई वडिलांनी कुरखेडा पोलीस ठाणे गाठत भावांच्या अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करत नराधमांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.