महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत मालवाहू ट्रकचा भीषण अपघात; २ जण ठार - Gadchiroli Truck Accident

कोरची-पुराडा मार्गावरील बेडगावपासून ४ किमी अंतरावरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात चालकाचा आणि वाहकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

गडचिरोलीत मालवाहू ट्रकचा भीषण अपघात

By

Published : Jul 25, 2019, 8:48 PM IST

गडचिरोली -कोरची-पुराडा मार्गावर गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक करणारा ६ चाकी ट्रक पलटी झाला. या घटनेत २ जण जागीच ठार झाले असून ते छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहेत. मृतांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.

छत्तीसगड राज्यातील हा ट्रक (सीजी ०७, बीएम ९२१३) मालवाहतूक करत होता. दरम्यान, कोरची-पुराडा मार्गावरील बेडगाव पासून ४ किमी अंतरावरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. हा अपघात इतका भीषण होता, की चालकाचा आणि वाहकाचा जागीच मृत्यू झाला. चालक वाहनाखाली अक्षरशः चिरडला गेला. घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details