महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली : आज 289 जणांची कोरोनावर मात; तर 21 जणांचा मृत्यू - गडचिरोली कोरोना स्थिती

जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 20, 097 पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15, 047वर पोहोचली आहे. तसेच सद्यस्थितीत 4678 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

गडचिरोली कोरोना
गडचिरोली कोरोना

By

Published : Apr 28, 2021, 10:35 PM IST

गडचिरोली - आज (बुधवार) जिल्ह्यात 622 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तसेच 289 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 20, 097 पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15, 047वर पोहोचली आहे. तसेच सद्यस्थितीत 4678 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 372 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज (बुधवारी) 21 नवीन मृत्यूमध्ये 40 वर्षीय पुरुष कोजबी ता. आरमोरी, 50 वर्षीय पुरुष ता.आरमोरी, 67 वर्षीय पुरुष ता.कुरखेडा, 52 वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली, 52 वर्षीय पुरुष गडचिरोली, 70 वर्षीय महिला रामपूरी वार्ड गडचिरोली, 44 वर्षीय पुरुष रामनगर गडचिरोली, 62 वर्षीय पुरुष शंकरनगर गडचिरोली, 56 वर्षीय पुरुष बेलगाव ता. कोरची , 54 वर्षीय पुरुष माता मंदिर गोकूल नगर गडचिरोली, 61 वर्षीय पुरुष वडसा, 40 वर्षीय पुरुष कुड्डीरामपल्ली ता.मुलचेरा, 50 वर्षीय पुरुष गोविंदपूर गडचिरोली, 68 वर्षीय पुरुष गडचिरोली, 46 वर्षीय महिला रामनगर गडचिरोली, 54 वर्षीय पुरुष आरमोरी, 50 वर्षीय पुरुष आरमोरी, 53 वर्षीय पुरुष ता.वडसा, 62 वर्षीय पुरुष ता. ब्रम्हपूरी जि.चंद्रपुरी , 65 वर्षीय पुरुष जारावंडी ता.एटापल्ली, 64 वर्षीय पुरुष धानोरा, यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.87 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 23.28 टक्के तर मृत्युदर 1.85 टक्के झाला आहे. नवीन 622 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 182, अहेरी तालुक्यातील 38, आरमोरी 46, भामरागड तालुक्यातील 18, चामोर्शी तालुक्यातील 33, धानोरा तालुक्यातील 26, एटापल्ली तालुक्यातील 36, कोरची तालुक्यातील 42, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 41, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 23, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 50 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 87 जणांचा समावेश आहे. तर आज (बुधवारी) कोरोनामुक्त झालेल्या 289 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 173, अहेरी 09, आरमोरी 34, भामरागड 00, चामोर्शी 11, धानोरा 08 , एटापल्ली 05, मुलचेरा 07, सिरोंचा 02, कोरची 07, कुरखेडा 14, तसेच वडसा येथील 19 जणांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details