गडचिरोली- हजरत सय्यद अहमद जिलानी बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यातील तब्बल पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी गडचिरोली येथील दर्ग्यावर गर्दी केली आणि जिलानी बाबांचे दर्शन घेतले.
जिलानी बाबांच्या जन्मोत्सव सोहळ्यात पाच राज्यातील हजारो भाविकांची गर्दी - भाविकांची गर्दी
हजरत सय्यद अहमद जिलानी बाबा यांचा जन्मोत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यातील तब्बल पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी गडचिरोली येथील दर्ग्यावर गर्दी केली.
तीन दिवसीय जन्मोत्सव सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. धार्मिक प्रवचन तसेच धार्मिक ग्रंथाचे पठण करण्यात आल्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजता परचम कुशल व फातेहा ख्वानी (झेंडावंदन) करण्यात आले. त्यानंतर साडेनऊ वाजता गडचिरोली शहरातून जुलूस काढून लंगरमध्ये महाप्रसाद कार्यक्रम पार पडले. तसेच रात्री कव्वालीचा कार्यक्रम घेण्यात आला.
या जन्मोत्सव सोहळ्यासाठी विदर्भासह महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश राज्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली. येथे भाविकांचे जत्थे दरवर्षीच दाखल होत असल्याने पोटेगाव बायपास मार्गावर विविध दुकानं सजली होती. जन्म उत्सव शांततेत पार पडावे, यासाठी जिलानी बाबा ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले. येथे पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. आज बुधवारी या जन्मोत्सवाचा समारोप होणार आहे.