महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यपालांच्या उपस्थितीत गडचिरोलीतून सीआरपीएफची सायकल रॅलीस प्रारंभ, रश्मी शुक्लांची होती उपस्थिती - Governor Bhagat Singh Koshyari

सीआरपीएफच्या गडचिरोली ते गुजरात अशा सायकल रॅलीचा उत्साही प्रारंभ मंगळवारी (दि. 12) गडचिरोलीतून झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. गडचिरोलीच्या सीआरपीएफ बटालियन 192 च्या अभियान मुख्यालयातून रॅली प्रारंभ झाली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल कोश्यारी सोमवारीच गडचिरोलीत पोहोचले होते. सुमारे एक हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया, गुजरात येथे ही रॅली पोहोचणार आहे.

d
d

By

Published : Oct 12, 2021, 12:26 PM IST

Updated : Oct 12, 2021, 12:46 PM IST

गडचिरोली - फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आज (दि. 12) गडचिरोलीत राज्यपालांच्या कार्यक्रमात दिसल्या. राज्यात त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्याने उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

राज्यपालांच्या उपस्थितीत गडचिरोलीतून सीआरपीएफची सायकल रॅलीस प्रारंभ

रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथे सीआरपीएफच्या दक्षिण क्षेत्राच्या अपर महासंचालक पदावर कार्यरत आहेत. आज गडचिरोलीत सीआरपीएफच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या उपस्थित राहिल्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रश्मी शुक्लाही मंचावर हजर होत्या. राज्यात त्यांच्यावर फोन टॅप करण्याचे आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या सार्वजनिक ठिकाणी दिसून आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.

सीआरपीएफच्या सायकल रॅलीचा प्रारंभ

मंगळवारी (दि. 12) गडचिरोलीतून सीआरपीएफच्या गडचिरोली ते गुजरात अशा सायकल रॅलीचा उत्साही प्रारंभ झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. गडचिरोलीच्या सीआरपीएफ बटालियन 192 च्या अभियान मुख्यालयातून रॅली प्रारंभ झाली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल कोश्यारी सोमवारीच गडचिरोलीत पोहोचले होते. सुमारे एक हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया, गुजरात येथे ही रॅली पोहोचणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील निमलष्करी दलांच्या वतीने अशाच प्रकारच्या सायकल रॅली काढण्यात येत आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली येथून निघालेली ही सायकल रॅली 31 ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात समाप्त होणार आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातून मार्गक्रमण करत रॅली केवडीया येथे पोहोचणार आहे. महाराष्ट्रातील आपल्या मार्गात विविध ठिकाणी या सायकल यात्रेचे स्वागत करत सहकार्य करण्याचे आवाहन सीआरपीएफच्या वतीने करण्यात आले आहे. निमलष्करी दले देशाचा मुकुट आहेत, असा गौरव राज्यपालांनी आपल्या याप्रसंगीच्या भाषणातून केला. देशाच्या अंतर्गत भगत जिथे सैन्य पाठविणे शक्य नाही तिथे निमलष्करी दलांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

कोण आहेत रश्मी शुक्ला..?

  • 15 ऑगस्ट 1965 रोजी मुंबई येथे जन्म
  • शुक्ला यांचे संपूर्ण शालेय शिक्षण मुंबईत झाले.
  • 1988 च्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी
  • राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला हे दोघेही 1988 बॅचचे अधिकारी
  • शुक्ला यांनी सिव्हिल डिफेन्सला महासंचालकपदी काम पाहिले.
  • राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदाचे कामही रश्मी शुक्लांनी पाहिले आहे.
  • रश्मी शुक्ला सध्या सीआरपीएफमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी कार्यरत आहेत.

हेही वाचा -राज्यपालांची गडचिरोलीतील 'सर्च शोधग्राम'ला भेट; सर्च संस्थेच्या कार्याचे केल कौतुक

Last Updated : Oct 12, 2021, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details