महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीच्या शासकीय विज्ञान महाविद्यालयात 100 बेडचे कोविड सेंटर सुरू होणार

खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी शासकीय महाविद्यालयातील नवीन कोविड केअर सेंटरला भेट दिली व तेथील व्यवस्था तथा सोयी -सुविधांची पाहणी केली. या कोविड सेंटर मधून बाधित रुग्णांना योग्य आरोग्य सेवा देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या.

रुग्णालयाची पाहणी केली
रुग्णालयाची पाहणी केली

By

Published : Apr 24, 2021, 10:45 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात दररोज कोरोना बाधित रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णासाठी बेड कमी पडत आहेत. या गंभीर बाबींची दखल घेत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पुढाकार घेत चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयात 100 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.

योग्य सुविधा देण्याच्या सूचना-

खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी शासकीय महाविद्यालयातील नवीन कोविड केअर सेंटरला भेट दिली व तेथील व्यवस्था तथा सोयीसुविधांची पाहणी केली. या कोविड सेंटरमधून बाधित रुग्णांना योग्य आरोग्य सेवा देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सेवा प्रमुख सुनीलजी मेहर, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विकास वडेट्टीवार, प्राचार्या चौधरी, डॉ. कामडी, डॉ. बिडकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details