महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला दिन विशेष : आत्मसमर्पित महिला नक्षलींनी केले आत्मसमर्पणाचे आवाहन - महिला दिन विशेष

आपण जे भोगले ते इतर महिलांना भोगण्याची वेळ येऊ नये, म्हणून आपण स्वतः महिला दिनाच्या माध्यमातून नक्षलींमध्ये गेलेल्या इतर महिलांना नक्षल जीवन सोडून सुखी जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करत असल्याचे म्हटले आहे.

महिला दिन विशेष
महिला दिन विशेष

By

Published : Mar 8, 2020, 2:45 PM IST

गडचिरोली - नक्षलवादी जीवनाला कंटाळून गडचिरोली पोलिसांसमोर आजपर्यंत १९४ महिला नक्षलींनी आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पित महिलांनी आज महिला दिनानिमित्त एकत्र येत नक्षलविरोधात घोषणा देऊन महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. यावेळी त्यांनी नक्षल चळवळीत काम करीत असलेल्या महिला नक्षलींना आत्मसमर्पण करून सुखी जीवन जगण्याचे आवाहन केले.

आत्मसमर्पित महिला नक्षलींनी केले आत्मसमर्पणाचे आवाहन

आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलींनी नक्षलवादी जीवनाची आठवण काढताच मनात धस्स झाल्याची आणि अंगावर शहारे आल्याची भावना व्यक्त केली. त्या नरक जीवनाच्या आठवणी देखील नकोशा आहेत, असे सांगितले. त्याचबरोबर आपण जे भोगले ते इतर महिलांना भोगण्याची वेळ येऊ नये, म्हणून आपण स्वतः महिला दिनाच्या माध्यमातून नक्षलींमध्ये गेलेल्या इतर महिलांना नक्षल जीवन सोडून सुखी जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा -Women's Day : गोंदिया एसटी आगारात महिला राज, 45 महिला कार्यरत

आत्मसमर्पित झरीना हिने सांगितले, २००४ साली इयत्ता तिसरीत शिकत असताना नक्षलवाद्यांनी अल्पवयीन वयात मला बळजबरीने त्यांच्या संघटनेत नेले. वरिष्ठ तेलगू नक्षलवादी हे स्वतःच्या फायद्यासाठी आमच्यासारख्या सामान्य आदिवासी महिलांना नक्षलींमध्ये भरती करून त्यांचा वापर करून घेतात. या वरिष्ठ तेलगू नक्षलवाद्यांचा डाव लक्षात आल्यानेच मी आत्मसमर्पण केल्याचे ती म्हणाली. त्याचबरोबर महिला दिनानिमित्त इतर नक्षल महिलांनी देखील लवकरात लवकर आत्मसमर्पण करावे असे आवाहन तिने केले.

हेही वाचा -महिला दिन विशेष: आदिवासी महिलांच्या गोडंबी व्यवसायातील वास्तव

ABOUT THE AUTHOR

...view details