महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस अधीक्षकांनी भामरागडमध्ये नागरिकांशी कोरोनाविषयी साधला थेट संवाद - SP Shailesh Balkawade

'कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधात लढाईमध्ये गडचिरोली जिल्हा आपणा सर्वांमुळे यशस्वी झाला हे तमच्या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले. आजपर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही,' असे शैलेश बलकवडे म्हणाले. त्यांनी नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले.

sp shailesh balakawade  meet people in bhamragad
पोलीस अधीक्षकांनी भामरागडमध्ये नागरिकांशी कोरोनाविषयी साधला थेट संवाद

By

Published : May 1, 2020, 8:14 AM IST

गडचिरोली- जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुरुवारी भामरागड पोलीस स्टेशनला आकस्मिक भेट दिली. त्यानंतर भामरागड गावात फिरून गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. 'कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधात लढाईमध्ये गडचिरोली जिल्हा आपणा सर्वांमुळे यशस्वी झाला हे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले. आजपर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही,' असे ते म्हणाले.

अतिसंवेदनशील तालुका म्हणून भामरागड तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे या भागात मोठे अधिकारी येण्याचे प्रमाण आहे जे येतात ते दौऱ्याची माहिती कोणाला देत नाहीत. हेलिकॉप्टरने येतात आपल्या विभाग प्रमुखांशी संवाद साधून निघून जातात. फार कमी अधिकारी असतात जे लोकांशी थेट संवाद साधतात असाच कोरोनाविषयी संवाद जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नागरिकांशी साधला आहे.

बलकवडे यांच्यासोबत अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल, भामरागड चे एसडीपीओ डॉ. कुणाल सोनवणे, भामरागडचे पोलीस निरीक्षक संदीप भांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर,पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाढ, ज्ञानेश्वर झोल आदी उपस्थित होते.

'आपण आज पर्यंत सामाजिक अंतर राखून जिंकलो, आताही घरातच राहणे योग्य आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये ही लढाई संपली नाही, सामाजिक अंतर या पुढेही कायम ठेवायचे आहे. त्यासाठी आपण आपल्या जबाबदारी पार पाडल्या पाहिजेत,' असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले. दुकनदारांनी जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन ठेवाव्या. दुकानात गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करुन मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन बलकवडे यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत बोलताना ग्रामस्थांनी मुख्य समस्या मांडल्या. भामरागड येथील पूर व पूल या संदर्भात चर्चा केली. पुलाचे बांधकाम लवकर वनविभागाकडील अडचणी दूर करुन यावर्षी सुरु होईल का असे प्रश्न मांडले. लॉकडाऊन संपल्यानंतर ते सुरु होईल, शासन प्रशासनातर्फे पुलाचे बांधकामाचा प्रश्न सोडवला जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details