गडचिरोली - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली पोलीस दलाच्या 67 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान करुन त्यांनी सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.
गडचिरोलीत ६७ पोलीस अधिकाऱ्यांनी केले रक्तदान - कोरोनाच्या फैलावामुळे देशासह राज्याीतील रक्तसाठा कमी
कोरोनाच्या फैलावामुळे देशासह राज्याीतील रक्तसाठा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत ६७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
कोवीड-१९ या साथीच्या रोगाच्या फैलावामुळे राज्यातील रक्तपेढीतील रक्तसाठा कमी होत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी जनतेला सोशल डिस्टनसिंगचे पालन करत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात पोलीस दलाच्या ६७ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व रक्त दात्यांचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले.