महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Raut On Sharad Pawar : शरद पवार भाजपासोबत गेल्यास काँग्रेसचा प्लॅन तयार? पवारांच्या गुप्त भेटीमुळे संभ्रमाचे वातावरण - डॉ. नितीन राऊत - Sharad Pawar

शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांच्यात झालेल्या बैठकीमुळे (Sharad Pawar Ajit Pawar Secret Meeting) महाविकास आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर डॉ. नितीन राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवारांच्या गुप्त भेटीमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते सोबत आले नाही, तरी काँग्रेस सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे.

Nitin Raut On Sharad Pawar
डॉ. नितीन राऊत

By

Published : Aug 16, 2023, 9:38 PM IST

डॉ. नितीन राऊत यांची प्रतिक्रिया

चंद्रपूर :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे शरद पवारांच्या भूमिकेबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण (Confusion about Sharad Pawar role) झाला आहे. पण हा गोंधळ दूर करण्यात पवारांसारखे ज्येष्ठ नेते सक्षम आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाहीत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी म्हटले आहे. ते आज चंद्रपुरात बोलत होते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस राष्ट्रवादीवर बाजी मारणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला असता डॉ. नितीन राऊत यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीच्या चर्चेला पेव फुटले आहे.


काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक :राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे लोकसभेची ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसच्या दृष्टिकोनातून ही जागा अत्यंत महत्त्वाची असून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी लोकसभा निरीक्षक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा :यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली असून या बैठकीचा अहवाल पक्षनेत्यांना पाठविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीबाबत बरीच सकारात्मक चर्चा झाली असून काँग्रेस निवडणूक सक्षमपणे लढवेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे. तेव्हा पक्षातील सर्वांनी मतभेद विसरून काम करावे, असा सल्ला नितीन राऊत यांनी दिला आहे. यावेळी निरीक्षक मुनीज पठाण, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, महिला अध्यक्षा चंदा वैरागडे, विनोद दत्तात्रय, नंदू नगरकर आदी उपस्थित होते.

सात दिवसांत होणार अहवाल सादर :माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार यांनी उपस्थित राहून विभागातील माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाने येथे पाठवले आहे. लोकसभा क्षेत्रातील संघटना बांधणी, बूथ कमिटीचे नियोजन, स्थानिक समस्यांवर उपाय योजना याची माहिती जाणून घेतली.



त्या भेटीनंतर संभ्रमाचे वातावरण :शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे महाविकास आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर डॉ. नितीन राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवारांच्या गुप्त भेटीमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने ते भाजपसोबत जाणार नसल्याचे मानले जात आहे. ते सोबत आले नाही तरी काँग्रेस सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे. काँग्रेस हा तळागाळातील पक्ष असल्याने त्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत, त्यामुळे पवार सोबत आले नाहीत तरी फारसा फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.


हेही वाचा -

  1. Nana Patole : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा - नाना पटोले
  2. Ajit Pawar Banner: शरद पवार अन् अजित पवार एकाच बॅनरवर; ऐका काय म्हणतात स्थानिक नेते
  3. Politics over Pawar Meeting : 'गुप्त' भेटीत शरद पवारांना मंत्रीपदाची ऑफर? आघाडीतील सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता

ABOUT THE AUTHOR

...view details