गडचिरोली- स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आज (सोमवार) गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. विदर्भ स्वतंत्र झाल्यावरच गडचिरोली जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी गडचिरोली, चामोर्शीत आंदोलन
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आज (सोमवार) गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -मैत्रिणींना फिरवण्यासाठी स्पोर्टबाईक चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक, 20 स्पोर्टबाईक जप्त
विदर्भातील लोकांना मुंबईतील मंत्रालय कधीच धावून येऊ शकत नाही. विदर्भ आजही मागासच आहे. राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय विकासाची गंगा इथपर्यंत कधीच येऊ शकत नाही, अशी भावना येथील लोकांची आहे. त्यामुळे विदर्भ राज्य व्हावं, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. विविध राजकीय पक्षातील विदर्भवादी नेते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनामुळे नागपूर, धानोरा, अहेरी आणि चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक तासभर खोळंबली होती. तर, चामोर्शी येथेही रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन्ही आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतले होते.