गडचिरोली - नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथे हल्ला केला. या हल्ल्यात १५ जवान तसेच एक वाहन चालक यांना वीरमरण आले. हा हल्ला म्हणजे गु्प्तचर विभागाचे अपयश नाही, असे पोलीस महासंचालक जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जैस्वाल म्हणाले, दोन तासांपूर्वी ही घटना घडल्याने आमच्याकडे पूर्ण माहिती नाही. सध्या नक्षलवाद्यांशी दोन हात सुरू आहेत, आम्ही सर्व बाबी लक्षात घेऊन त्यावर कारवाई करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस अशा घटनांना सामोरे जाण्यास सक्षम आहे.