गडचिरोली- रस्त्यावर थुंकणे, तोंडाला मास्क न बांधणे तसेच विनाकारण मुख्य बाजारात गाडीवर फिरणाऱ्यांवर नगर पंचायतमार्फत पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे ठाणेदार संदीप भांड यांनी पोलिसांची 24 तास गस्त कडक केली आहे. विनाकारण टू-व्हीलर घेऊन फिरणाऱ्यांना पोलीस सरळ हातात चलन देत असल्याने मागील दोन दिवसांपासून विनाकारण शहरात फिरणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; भामरागड नगर पंचायतीचे कठोर पाऊल - गडचिरोली कोरोना बातमी
नागरिकांनी कृपया बाहेर न पडता संसर्ग होण्यापासून दूर राहून गर्दी टाळावी, असे आवाहन स्थानिक नगर पंचायत प्रशासन यांच्याकडून वारंवार करण्यात आले होते. त्यामुळे किराणा, दूध, भाजीपाला इतर बाबींसाठी लोकांनी गर्दी न करता संसर्गापासून बचावासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने केले होती.
नागरिकांनी कृपया बाहेर न पडता संसर्ग होण्यापासून दूर राहून गर्दी टाळावी, असे आवाहन स्थानिक नगर पंचायत प्रशासन यांच्याकडून वारंवार करण्यात आले होते. त्यामुळे किराणा, दूध, भाजीपाला इतर बाबींसाठी लोकांनी गर्दी न करता संसर्गापासून बचावासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने केली होती.
संचारबंदीमध्ये सूट दिलेल्या ठिकाणी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीतील सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. त्या ठिकाणी गर्दी न होऊ देणे, स्वच्छता राखणे, हात धुण्याची व्यवस्था करणे अशा बाबींची अंमलबजावणी करावयाची आहे. त्या निमित्ताने पोलिसांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला. काल प्रभारी तहसीलदार सत्यनारायण सीलमवार, मुख्याधिकारी सूरज जाधव, स्वप्नील मखदूम, सदाशिव गावडे इतर कर्मचारी गावातील भाजीपाला, किराणा मेडिकल व पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी भेट दिली.