गडचिरोली - सीआरपीएफ व पोलीस जवानांना टार्गेट करण्यासाठी नक्षलवाद्यांनी रचलेला कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.
गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला हेही वाचा -पुण्यातील लाकडी फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही
भामरागड तालुक्यातील हेडरी पोलीस मदत केंद्र हद्दीतील बोडमेटा जंगल परिसरात पोलीस व सीआरपीएफ बटालियन १९१ कंपनीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. तेव्हा नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र जवानांनी प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांचा कट उधळवून लावला.
गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला पोलीस जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर संबंधित जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, मोठा साहित्य साठा जप्त केला. शोध मोहीम राबवताना नक्षलवाद्यांनी आणखी एक भुसुरुंग पेरून ठेवल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. तेव्हा समय सूचकता दाखवत पोलिसांनी भुसुरुंग स्फोट घटनास्थळावरच निकामी केला. त्याचबरोबर जवानांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर नक्षली साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले आहे.
गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला