महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक

या बैठकीला छत्तीसगड, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या लगतच्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

By

Published : Mar 14, 2019, 9:02 PM IST

अधिकारी आणि पोलिसांची बैठक

गडचिरोली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भागातील आंतरराज्यीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची महत्वपुर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीला छत्तीसगड, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या लगतच्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या बैठकीत गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सादरीकरण करून तपशिल देऊन माहिती अवगत करुन दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासनाच्या तयारी बाबत माहिती दिली. नक्षली कारवाईमध्ये नागरिकांची विनाकारण हत्या होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे असे सूचित केले.

नक्षलप्रभावित चारही राज्यातील लोकसभा मतदार संघात एकाचवेळी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालून सर्व ठिकाणची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी कोणते उपाय करता येतील यावर चर्चा करण्यात आली. ही बैठक पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुनाल खेमनार, गोंदियाचे जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, राजनांदगावचे जिल्हाधिकारी रोहीत व्यास, अपर जिल्हाधिकारी कुळमेथे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह आदी प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details