गडचिरोली- भारत देशच नव्हे तर संपूर्ण जग कोरोनाच्या लढाईत एकत्र आल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. या काळात अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आलापल्ली येथील डॉक्टर, समाजसेवक चरणजीत सिंह सलुजा यांनी मसाला भात आणि शुद्ध पिण्याचा पाण्याची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.
कोरोना लढाईत झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी झटतायेत अनेक हात - गडचिरोली कोरोना बातमी
सकाळी घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नाही. सध्या उपहारगृह वगैरे बंद असल्याने दिवसभर उपाशीपोटी काम करावे लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांना वेळेवर जेवायला मिळावे या उद्देशाने आलापल्ली येथील डॉक्टर, समाजसेवक चरणजीत सिंह सलूजा यांनी मसाला भात आणि शुद्ध पिण्याचा पाण्याची व्यवस्था केली.
कोरोना या महामारीला रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने पुढाकार घेतला असून यामध्ये आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि इतर विभागातील कर्मचारी दिवसरात्र एक करून आपली सेवा बजावताना दिसत आहेत. सकाळी घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नाही. सध्या उपहारगृह वगैरे बंद असल्याने दिवसभर उपाशीपोटी काम करावे लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांना वेळेवर जेवायला मिळावे या उद्देशाने आलापल्ली येथील डॉक्टर, समाजसेवक चरणजीत सिंह सलूजा यांनी मसाला भात आणि शुद्ध पिण्याचा पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आलापल्ली परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जेवणाची सोय व्हावी आणि त्यांना काम करताना अडचण येऊ नये तसेच त्यांचे मनोबल वाढावे यासाठी डॉ सलूजा यांनी स्वतः पुढाकार घेतला. या कर्मचाऱ्यांना जेवणाची सोय केली. ते स्वतः आपल्या चारचाकी वाहनातून ठिकठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करून जेवण आणि पाण्याची सोय करीत आहेत. आलापल्ली परिसरात पुढे सुद्धा ईतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे कर्मचारी आपले जीव मुठीत घेऊन उपाशीपोटी काम करत आहे, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपला हा छोटंसं प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.