महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेताना जिल्ह्यात किती प्रमाणात लसीकरण झाले याबाबतची माहिती घेतली. जिल्ह्यातील अधिकाधीक लोकांना लस कशी उपलब्ध होईल व अधिकाधीक लसीकरण कसे होईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : May 7, 2021, 5:42 PM IST

गडचिरोली -जिल्ह्यातील कोरोना मृत्युदर कमी करण्यासाठी अधिकाधीक नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली असता केले. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला व लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश यावेळी दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेताना जिल्ह्यात किती प्रमाणात लसीकरण झाले याबाबतची माहिती घेतली. जिल्ह्यातील अधिकाधीक लोकांना लस कशी उपलब्ध होईल व अधिकाधीक लसीकरण कसे होईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. यावेळी माजी ऊर्जामंत्री तथा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details