महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महापुरुषाच्या लोक कल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन' - शिव स्वराज्य दिन गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी 'शिव स्वराज्य दिन' सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते साजरा करण्यात आला.

Gadchiroli
Gadchiroli

By

Published : Jun 6, 2021, 7:56 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात आज (6 जून) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी 'शिव स्वराज्य दिन' सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. तसेच, यड्रावकर यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'राज्यात सर्वच ठिकाणी शिवस्वराज्य दिनानिमित्त नागरिकांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे', असे त्यांनी यावेळी म्हटले. कोविड संसर्गाबाबत आवश्यक काळजी घेवून कमीत कमी उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम जिल्हा परिषद येथे साजरा करण्यात आला.

गडचिरोलीत राज्याभिषेक दिन साजरा

'महापुरुषाच्या लोक कल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन'

'छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोक कल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमिपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे', अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हेही वाचा -ग्रामविकासाचा पाया शिवछत्रपतींनी घातला - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details