गडचिरोली - पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची नक्षलवाद्यांनी गळा चिरून हत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. काशिराम कोर्चा (वय ३६) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांचा 'खबऱ्या' असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या - rankatta
काही दिवसांपूर्वी ते धानोरा तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी रानकट्टा येथे परतले होते. सहा महिन्यांपासून ते रानकट्टा येथे राहत होते. रविवारी रात्री नक्षलवादी अचानक गावात आले. काशिराम हे पोलिसांचे खबरे आहेत असा आरोप त्यांनी केला आणि काशिरामला उचलून नेले.
काशिराम हे अनेक वर्षांपासून गडचिरोली येथे राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी ते धानोरा तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी रानकट्टा येथे परतले होते. सहा महिन्यांपासून ते रानकट्टा येथे राहत होते. रविवारी रात्री नक्षलवादी अचानक गावात आले. काशिराम हे पोलिसांचे खबरे आहेत असा आरोप त्यांनी केला आणि काशिरामला उचलून नेले.
नक्षलवाद्यांनी काशिराम यांची गावाबाहेर नेऊन गळा चिरुन हत्या केली. मृतदेह तिथेच सोडून नक्षलवाद्यांनी पोबारा केला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंबंधी अज्ञात नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.