गडचिरोली- भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदतकेंद्रांतर्गत येणाऱ्या मर्दहुर गावात नक्षल्यांनी एका नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली. डोंगा कोमटी वेडदा, असे मृत नागरिकाचे नाव असून तो नैनवाडी गावातील रहिवासी होते. ते लग्नसोहळ्यासाठी मर्दहूर गावात गेले होते.
पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय, भामरागडमध्ये नक्षल्यांकडून एकाची हत्या - नागरिकाची
भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदतकेंद्रांतर्गत येणाऱ्या मर्दहुर गावात नक्षल्यांनी एका नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली.
आज पहाटे नक्षल्यानी डोंगा कोमटी वेडदा या नागरिकाला झोपेतून उठवून आपल्या सोबत नेऊन हत्या केली. या नागरिकाची पोलीस खबऱ्या असल्याचा संशयावरून केल्याची माहिती आहे. मागील ६ दिवसात नक्षल्यांकडून अशी तिसरी घटना घडली. तत्पूर्वी महाराष्ट्र दिनाच्या पहाटेला कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे नक्षलवाद्यांनी 27 वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर काही तासातच जांभूळखेडा येथील लेंढारी नाल्यावर भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यामध्ये 15 जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर आज पुन्हा हत्येची घटना घडली आहे. तर काल भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात नक्षली बॅनर आढळून आले होते.