गडचिरोली -प्रशासन आणि जनता यांच्या परस्पर सहयोगातून शाश्वत विकासाकडे वाटचालीचे प्रारूप म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम असे नक्षलग्रस्त संवेदनशील आदिवासी वस्ती केडमारा गाव. या गावात पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून बहुउद्देशीय तलावाची निर्मिती करत पाणीटंचाईची समस्या दूर केली आहे.
पोलिसांनी लोकसहभागातून शोधला समस्येवर उपाय
पोलीस मदत केंद्र ताडगावच्या पोलीस पथकाने केडमारा गावाला दिलेल्या ग्रामभेटीदरम्यान ग्रामस्थांनी पाणी तसेच शेतीसाठी पाण्याची भीषण टंचाई असल्याबाबत समस्या मांडली. यानंतर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, यांच्या मार्गदर्शनात केडमारा गावातील पाणी समस्या सोडविण्याचा निर्णय पोलीस मदत केंद्र ताडगावचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक सौरभ पिंगळे यांनी घेतला. या समस्येवर शाश्वत व बहूउद्देशीय उपाय शोधला, तो म्हणजे गावाला एक मोठा तलाव बांधून देणे. यासाठी ग्रामस्थांबरोबर बैठक घेवून पोलीस व लोकसहभागातून तलाव बांधण्याचे ठरले.