गडचिरोली - माओवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर भामरागड तालुक्यातील लाहेरी-भामरागड मार्गावरील हिंदेवादाजवळ एसटी महामंडळाची बस अडवली आहे. झाडे तोडून मार्ग बंद केला असून तोडलेल्या झाडांवर माओवाद्यांनी बंदचे आवाहन करणारे बॅनर लावले आहे.
गडचिरोलीत माओवाद्यांचा बंद : माओवाद्यांनी रस्त्यावर झाडे तोडून बस अडवली हेही वाचा -रेल्वे, विमान प्रवासावर लक्ष केंद्रित करताना राज्याच्या सीमांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष
लाहेरी-भामरागड मार्गावर तोडलेली झाडे टाकून रस्ता अडवला
बॅनरमध्ये 26 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय बंदला यशस्वी करण्याचा आवाहन केले आहे. 26 नोव्हेंबर रोजी वाहने, दुकाने, बाजार आदी बंद ठेवण्याचा आवाहन करण्यात आले आहे. मोदी सरकाच्या देशविरोधी उद्देशाचा विरोध करून जनविरोधी सरकारच्या पुतळ्याला जाळण्याचे आवाहन केले आहे.
लाहेरी-भामरागड मार्गावर झाडे तोडल्याने या मार्गावरील वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे. पोलीस जवान मार्ग मोकळा करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.
हेही वाचा -पालकांची लूट करणाऱ्या शाळेवर 'प्रहार'; 4 कोटी परत करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे आदेश